जोगवा
जोगवा
1 min
408
जोगवा मागते ग अंबाबाई
जोगवा मागते ग
जोगवा दे ग अंबाबाई
जोगवा दे ग
बळीराजाचे शेतशिवार पिकाने डौलु दे ग
कष्टांचे मोती त्याच्या हाती मिळु दे ग
घरात त्याच्या सुख,समृद्धी नांदु दे ग
जोगवा मागते ग अंबाबाई
जोगवा मागते ग
जोगवा दे ग अंबाबाई
जोगवा दे ग
बळीराजाच्या घामाच्या फुलांना
योग्य दाम मिळू दे ग
लक्ष्मी त्याचीही थोडी नटू दे ग
जोगवा मागते ग अंबाबाई
जोगवा मागते ग
जोगवा दे ग अंबाबाई
जोगवा दे ग
आहे बळीराजाची थोडीशी आस ग
त्याच्या गळ्याचा काढ तु फास ग
बळीराजास घेवू दे मोकळा श्वास ग
जोगवा मागते ग अंबाबाई
जोगवा मागते ग
जोगवा दे ग अंबाबाई
जोगवा दे ग