STORYMIRROR

varsha patil

Inspirational Others

4  

varsha patil

Inspirational Others

स्वातंत्र्याच्या नभात उधळू चांदणे आनंदाचे

स्वातंत्र्याच्या नभात उधळू चांदणे आनंदाचे

1 min
45

बस्स! आता खूप झालं,

ते जातीपातीच्या चष्म्यातून बघणं

तो चष्मा आता भिरकावून देऊ साता समुद्रापार

अन् पुन्हा घडवू दर्शन एकीचे

स्वातंत्र्याच्या नभात उधळू चांदणे आनंदाचे

आता नको तो स्त्री भ्रूण हत्येचा कट

अन् नको पाश विटाळाचे

तोडून टाकू बंध सारे

बलात्कार नि अत्याचाराचे

स्वातंत्र्याच्या नभात उधळू चांदणे आनंदाचे

पुन्हा बहरु दे शेत-शिवार

अन् होऊ दे पाखरांची किलबिलाट

लाभण्या शेतकऱ्यांनाही मान-सन्मान,

पुष्पहार करू गळ्यात अडकल्या फासाचे

स्वातंत्र्याच्या नभात उधळू चांदणे आनंदाचे

आता तिलाही घेऊ दे गगन भरारी

आनंदाने अन् आत्मविश्वासाने

अन् होऊ दे आत्मनिर्भर तिलाही

दरवळू दे गंध स्वबळावर फुललेल्या फुलाचे

स्वातंत्र्याच्या नभात उधळू चांदणे आनंदाचे

दीन-दुबळ्यांना करु सहकार्य

भेद नको आता उच्च-नीचतेचे

पुढे जाऊ त्यांनाही सोबत घेऊन

अन् साथ देऊ मागे थांबलेल्या पावलांचे

स्वातंत्र्याच्या नभात उधळू चांदणे आनंदाचे

बाळगू सदा अभिमान आपण

नागरिक म्हणून भारताचे

करू प्रयत्न तुम्ही-आम्ही आणि मीही

मान उंचावण्या देशाचे 

स्वातंत्र्याच्या नभात उधळू चांदणे आनंदाचे

Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational