STORYMIRROR

varsha patil

Children

3  

varsha patil

Children

बालपण

बालपण

1 min
127

लॉकडाऊन मध्ये वेळ मिळाला

अन उघडलं बालपणीचं पुस्तक,

आठवले ते दिवस अन

आईचं आम्ही फिरवलेलं मस्तक


आठवणींच्या त्या जुन्या पानांवर

आज नव्याने रमून गेलो,

खोडकरपणाचे ते दिवस

आज पुन्हा जगून गेलो


एकएक पान उघडेल तसे

दिसत होते खेळ निराळे

विटी-दांडू, लपाछपी अन

दारावर आलेले बर्फाचे गोळे


त्या खेळाने आम्ही सगळे

झालो कणखर खूप

मातीतल्या त्या खेळानेही

अनेकांचे गुढगे केले कुरूप


खेळ खेळता खेळता

आई ला ही फसवायचो गुपचूप

तरीही रोज जेवताना असायचं

फोडणीचं वरण अन भातावर तूप


एकाने चूक केली तर

लाटण्याने आईचा मार खायचा

आपल्यावर वेळ येण्याआधीच

दुसरा आपोआप शहाणा व्हायचा


त्या शहाणपणातच 

सारं भविष्य दडलं होतं

आई आजारी पडल्यावर

काम आम्ही वाटून घेतलं होतं


भावंडांच्या या समजूतदारपणाला

कुठे न कुठे परिस्थितीच कारण होती

हळूहळू आईच्या माराविनाच

मुले शहाणी बनत होती


तेव्हाचं ते शहाणपण

आता हरवल्यासारखं वाटतंय

आईची काळजी घेणारं ते मन

आता आईसाठीच हळहळतंय


चिमण्यांची ती चिवचिवाट

प्रत्येक सकाळ रम्य करायची

दिवसाच्या प्रत्येक सायंकाळी

पिले आपसूक घरट्यात जायची


आता राहिली नाही ती

चिवचिवाट कुठली

आवाजाची ती सकाळ

फक्त आठवणीतच साठली.


आठवणींचं हे पुस्तक मी

अजूनही कवटाळलंय उराशी

जेव्हा आठवतं बालपण

तेव्हा बोलते मी प्रत्येक पानाशी.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Children