आजचा स्वातंत्र्य दिन
आजचा स्वातंत्र्य दिन


आला स्वातंत्र्य दिवस
हर्ष जाहला जाहला
होता स्मरण वीरांचे
आज कंठ हा दाटला
अश्रू डोळ्यांमध्ये जरी
हास्य गालावरी फुले
राष्ट्रगीत ते ऐकुनी
झेंडा वाऱ्यावरी डुले
फडकतो हा तिरंगा
आज पुन्हा स्वाभिमाने
येण्या सुवर्ण दिवस
किती गेली बलिदाने
रक्त सांडले सांडले
स्वराज्याच्या हट्टापायी
जन्मसिद्ध हक्क सांगे
लोकमान्य ठायी ठायी
किती किती नावे घ्यावी
आज स्वातंत्र्यवीरांची
ऋण फेडण्या फेडण्या
p>
कमी भासे आयुष्याची
भास आहे की सत्य हे
मज कळेनासे झाले
भाग्य मानतो आमुचे
दिन स्वातंत्र्याचे आले
जरी स्वतंत्र आपण
राज्य कोरोनाचे चाले
महामारी हे संकट
आज देशावरी आले
यंदा शत्रू हा नवीन
घेऊ शस्त्रही वेगळे
हाती सॅनिटाईजर
मास्क लावू या सगळे
आता राहू या सजग
कोरोनाला या रोखण्या
लढू पुन्हा महायुद्ध
देश आपला जिंकण्या