कुणी पाहिलंय जगबुडीला ?
कुणी पाहिलंय जगबुडीला ?
कधी अवकाळी पाऊस, तर कधी
गारपिटीने छळलंय शेतकऱ्याला
कैक वर्षे कर्जाच्या ओझ्याने
शेतकरी लटकवून घेतोय फासाला
पण; कुणी पाहिलंय जगबुडीला ?
कधी त्सुनामीची लाट, भूकंप, तर कधी
महापुराने वेढलं गाव-शहराला
महापुराच्या संकटाने तर
व्यावसायिकही लागले देशोधडीला
पण; कुणी पाहिलंय जगबुडीला ?
इंटरनेट नि मोबाईलच्या टॉवरनेच
उध्वस्त केलं पाखरांच्या घरट्याला
अन्न-पाण्याविनाच आता
उपाशी मरावं लागतंय पशु-पक्षाला
पण; कुणी पाहिलंय जगबुडीला ?
कोरोनासारख्या महामारीनेही
जागीच थांबवलंय साऱ्या दुनियेला
लाखो लोकांच्या मृत्यूने आता
सुरुवात केलीये तांडवाला
पण; कुणी पाहिलंय जगबुडीला ?