स्वातंत्र्याचे गान
स्वातंत्र्याचे गान
चला मुलांनो , चला गाऊया
स्वातंत्र्याचे गान ...
एकदिलाने म्हणूया सारे
आमुचा देश महान ...|| धृ ||
मायभूमीच्या रक्षणासाठी
केले वीरांनी बलिदान
करूया वंदन तयांच्या स्मृतींना
जागवूनी अभिमान ...|| १ ||
झुगारूनी भेदभाव सारे
घेऊया एकतेचे वाण
भारतभूमी आपुली माता
ठेवूया मातेची शान ...|| २ ||
बंधूतेचे अन् समतेचे
गगनी फडकवू निशाण
अन्यायाला तुडवून लाऊ
होऊनी मनी बेभान ...|| ३ ||
आधार बनूया दीनदुबळ्यांचा
करूनी सर्वस्वाचे दान
कृतज्ञेची सुमने लेऊनी
फुलवूया उद्यान ...|| ४ ||
संस्काराचे बीज पेरूनी
दूर करूया अज्ञान
चिरंजीवी होवो भारतमाता
प्रभो , हेच आम्हां दे वरदान ...||५||
