स्वातंत्र्य
स्वातंत्र्य
1 min
154
दार सोन्याचे मला उघडून जाऊ दे
रान काट्यांचे मला तुडवून जाऊ दे
भावनांना रोखले आहे कशासाठी
कैद अश्रूंना जरा वाहून जाऊ दे
खेळ माझा संपला ना संपली ऊर्जा
पेटला वणवा मला पोळून जाऊ दे
घे तुला ऐश्वर्य माझे दान देतो मी
शब्द माझे एवढे घेऊन जाऊ दे
वेचले आयुष्य माझे मी उन्हामध्ये
भाग्य माझे भास्करा उजळून जाऊ दे