स्वातंत्र्य
स्वातंत्र्य
स्वातंत्र्याचा फक्त भास होतोय
गुलामगिरी तर आमच्या नशीबीच आहे
तुझ्या लेकींच्या पायात भारतमाते,
बंधनांच्या बेड्या बांधलेल्याच आहे
'विटाळ' म्हणून त्या चार दिवसांत
आजही मंदिरं बंद आहेत आमच्यासाठी,
पंख मिळावेत खर्या 'स्वातंत्र्याचे'
अंधश्रद्धेतून मुक्त होण्यासाठी
बलात्कारी नजरा आजही उभ्या आहेत
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,
स्वातंत्र्य मिळणार कधी मुक्त पणे फिरण्याचे
कि, मरावं आम्ही झुरत-झुरत असंच आयुष्यभर
स्वातंत्र्याचा फक्त भास होतोय
गुलामगिरी तर आमच्या नशीबीच आहे
