वासना
वासना
1 min
362
तुझ्या डोळ्यातली वासना
तिला स्पष्ट दिसत होती,
नजर चुकवून पळण्याची धडपड तिची
तुझ्या पुढे शून्य होती
केली ना पर्वा कशाची
बसलास जेव्हा तिच्या छातीवर,
लटकणार उद्या फासावर आता
आई-बापाची जबाबदारी म्हणतोस माझ्यावर
ओरडत होती तळमळून ती
"नका मारु मला, जाऊ द्या"
कळली ना जिवाची किंमत नराधमा
फाशी नको म्हणतोस जन्मठेप द्या
आता एकच विनंती न्याय देवता
न्याय तेवढा योग्य व्हावा,
सडक्या मेंदूवरती असल्या
कायद्याचाच एक बलात्कार व्हावा
