Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Yogita Takatrao

Classics Others

4.3  

Yogita Takatrao

Classics Others

स्वातंत्र्य

स्वातंत्र्य

1 min
462


बंधनांच्या स्वातंत्र्याला....

जर मुक्तता झळाळी ,

नको हे अन् ते करू 

स्त्रीच्या जुन्या- नव्या काळी !.......१


काय आवड-निवड ?

शून्य किंमत, आदर ,

तुझा फालतूच छंद

जप डोईचा पदर !.........२


नाही कमवत पैसा...

घरी आरामाचे काम ,

ऐकविती सारे नित्य 

वाया जाई दाम-घाम !......३


मानसिक कुचंबणा...

सोसूनही उभी पुन्हा , 

जीव वैतागून जाता

मुखी भाव ठरे गुन्हा !......४


सारे लपवून ठेवे....

दावे दुखऱ्या मनात ,

जपणूक यातनांची

सले-टोचे हृदयात !.......५


बोलावेच नच काही...

सांगावेही ना कुणाला , 

यंत्रवत जगताना

झगा आनंदाचा घाला !......६


मिरवून वर शोभा....

किती सुखी संसारात ,

असतील बाण भले

रूतलेले काळजात !...........७


परी हार मानणारी...

अशी नसे तिची ख्याती ,

पेटवून प्रगतीची

जागवेल ज्योत क्रांती !.......८


बदलले तिने रूप....

अंर्तबाह्य तेजस्विनी ,

सर्व क्षेत्र गाजवून

झाली विश्वाची स्वामिनी !......९



Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics