स्वातंत्र्य दिन चिरायू होवो
स्वातंत्र्य दिन चिरायू होवो
अमृत स्वातंत्र्य दिन
सोहळा हा स्वातंत्र्याचा
नयनरम्य दृश्यात
तिरंगा हा भारताचा ||१||
लालकिल्ल्यावर पहा
राष्ट्रध्वज फडकला
नियम सारे पाळूनी
ध्वजारोहण हा केला ||२||
राष्ट्रीय सण आपला
सारे साजरा करती
भूमीच्या रक्षणासाठी
जवान शहीद होती ||३||
वैविध्यतेत एकता
इथे मिळे पहायला
शांतीचा संदेश देई
पहा साऱ्या जगताला ||४||
नमन या तिरंग्याला
राखूनी देशाची शान
स्वातंत्र्य दिन चिरायू होवो
राखूनी देशा सन्मान ||५||