सुरक्षा आणि खबरदारी
सुरक्षा आणि खबरदारी

1 min

26
आज आली आहे परिस्थिती सुरक्षा खबरदारी घेण्याची
आरोग्याची काळजी घेणे आहे प्रथम स्थानी
मास्क सॅनिटायझर वापरणे आहे गरजेचे
सुरक्षा कवच सोबतीचे
पैसे असणाऱ्यांनी ते विकत घेतले
पैसे नसणाऱ्यांनी देवाला काळजी म्हटले
सध्या परिस्थिती अशी ओढवली
पोटासाठी पैशाची कमतरता झाली
पैसे असणाऱ्यांनी वेगवेगळ्या मास्क खरेदी करून सेल्फी काढली
पैसे नसणाऱ्यांनी घरात असलेल्या कापडांनी मास्क तयार केली
सध्या उभा ठाकला प्रश्न असा
जीव सांभाळून पोट भरण्याचा