सुपरपावर
सुपरपावर
सकाळ पासून रात्री पर्यंत
मशीन सारखे करते काम
स्वयंपाक करून धुनी भांडी करते
घर सांभाळून ऑफिसला जाते
थकवा नाही कधी तिच्या चेहऱ्यावर
तीच तर आहे खरी सुपरपावर
थकली कधी तरी तक्रार नाही करत
एक कप चहाची कोणाकडून अपेक्षा नाही करत
लहान मोठ्यांचा मागण्या पुरवत
स्वतःचे मात्र मन मारते
प्रत्येक कामात घेते पुढाकार
तीच तर आहे खरी सुपरपावर
प्रेमळ आई .पत्नी बनून मायेचा वर्षांव करते
तीच दुर्गा तीच चण्डिका बनून संकटाचा सामना करते
बिनपगारी काम करते चोवीस तास उभी राहून
दोन्ही घराचा मान राखते आपलं स्त्रीत्व सांभाळून
सन्मानाने जगू द्या तिला करा तिचा ही आदर
तीच तर आहे खरी सुपरपावर
