STORYMIRROR

Shakil Jafari

Abstract

3  

Shakil Jafari

Abstract

सुखाच्या आशेत

सुखाच्या आशेत

1 min
11.6K

सारंच जग

अंधाऱ्या गोधडीत

स्वतःला सामावून

झोपी गेलं आहे


वृक्षही आपल्या

पानांना मुडपून

विश्रांती घेत आहेत


पशुही

आरामात बसून

रवंथ करीत आहेत


पक्षीही पुन्हा

आपल्या घरट्यात

परतून

थकलेले पंख मुडपून

थकवा मिटवीत आहेत


पण मी मात्र

माझ्या

भौतिक सुख-साधनांसाठी

ऑफिसमध्ये बसून

अर्धा झोपेत

काम करीत आहे


प्रकृतीच्या नियमात

पूर्ण जग

सुखात आहे


पण त्या नियमांचा

उल्लंघन करून

माणूस म्हणवणारा

मी मात्र

दुःखाच्या छायेत

जगत आहे

ते पण

सुखाच्या आशेत...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract