सुखाचे चांदणे
सुखाचे चांदणे
सात सुरांच्या या सरीते मधूनी
चंद्र चांदणे फुलते मनोमनी।।
प्रतिभेच्या वेलीवरती चढूनी
रसिकांना भावते शब्द चांदणी।।
नऊ रसाच्या प्रवाही उतरूनी
येती अलगद सुखाची चांदणी।।
असे कविता आमुची सर्वेश्वर
चांदण्यात उडतो काव्य भ्रमर।।
शब्द चांदणी प्रकाश देते मना
चंद्र पण मागे तिच्या फिरतोना।।
हाती लेखणी घेवूनीया कवी तो
गुप्त चांदणे शोधूनीया काढितो।।
