सुगरण
सुगरण
अति प्रेमळ
शोभे सुगरण
करी उधळण
माया केवळ
रांधी सुग्रास
अन्न चवदार
वाढी दमदार
काढी गोग्रास
रसना तृप्त
देते खावयास
पाणी प्यावयास
आवड सुप्त
करी आग्रह
उत्तम जेवण
पदार्थ ठेवण
मनी निग्रह
रूचीत क्रांती
खरी अन्नपूर्णा
देऊनिया चूर्णा
उदर शांती
हर्ष मानसी
ढेकर तृप्तीचा
मान अतिथीचा
छंद राजसी