STORYMIRROR

Trupti Thorat- Kalse

Tragedy Inspirational

3  

Trupti Thorat- Kalse

Tragedy Inspirational

सुचतंय का काही मला....

सुचतंय का काही मला....

1 min
199

सुचतंय का काही मला

नाती जोपासता जोपासता 

शब्दांना हरवून बसले बघा!

नात्यांची सांगड घालता घालता

कवितेची सांगड वीसरलेच जरा.

याला हे आवडत त्याला ते आवडतं

पण माझं मन शब्दांमध्येच रमत.

नाती जपायलाही हवीच ना 

गोड शब्दांची झालर,

त्याशिवाय कशी पूर्ण होईल

नात्याची हो टाईट कॉलर.

खुपजण विचारतात कसं ग 

तुला हे सारं सुचतं म्हणतात?

कसं सांगू त्यांना ......

खरं तर, सुचतं काहीच नसतं ना मला.....

तेव्हा हे शब्द मला समजुन घेतात

आणि थकलेल्या ह्या माझ्या मनाला

पुन्हा लिहण्याचं बळ देतात.


ಈ ವಿಷಯವನ್ನು ರೇಟ್ ಮಾಡಿ
ಲಾಗ್ ಇನ್ ಮಾಡಿ

Similar marathi poem from Tragedy