STORYMIRROR

AnjalI Butley

Tragedy

3  

AnjalI Butley

Tragedy

सत्तेची हाव

सत्तेची हाव

1 min
293


सत्तेच्या हव्यासापोटी

आमिष दाखवले कोणी

धावतपळत सुटलो मी

मिळेल मला रगड्ड पैसा


कल्पनेच्या काठीला 

बांधला गेला पैसा

मनात चंग बांधला

तो मिळवण्याचा


धावत सुटलो

तो हाती मिळवण्यास

तसा तोही

माझ्या पुढेच धावत होता


सत्तेवर विराजमान

होणारी ती खुर्ची

नजरे समोरच होती

थाटात विराजमान होण्यास


पण लागणारा 

तो पैसा हाती

नाही लागला

धावपळ करता करता


धावतांना तोल जात होता

पैसाही हेलकावत होता

समोरचा भल्लामोठा खड्डा

सत्तेची खुर्ची मातीत विलीन होत होती


बघुन ते सारे

थांबाचे सोडुन 

पळतच राहीलो आशेवरती

पैसा हाती आल्यास सत्ता मिळेल



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy