STORYMIRROR

vaishali vartak

Inspirational

3  

vaishali vartak

Inspirational

सतृप्त मन

सतृप्त मन

1 min
214

मन माझे कोमल

दुखावते ते सहज

विचारांती मी बोलते

समजून बोलणे गरज


 मन अल्लड बालपणी

होता मातीचाच गोळा

मायबापांच्या संस्कार कृपे

 आज आनंदाचा सोहळा


होता कळीचे फूल माझे

मन धावे सुसाट वा-यापरी

 भूईवर तर क्षणात नभी

आवरू न शके आजवरी


मन झाले शब्दांचे पाखरु

धावे लेखणीतूनी क्षणा क्षणा

नाना रसातूनी न्हाऊन ते

आनंद देते जना मना


पहाता भीषण प्रसंग

मन माझे होतसे उदास

काही वेळा साठी तर

भासे मनास भकास


अनुभवे जाता काळ

 मन संतोषी आनंदले

प्रसन्नता लाभे जीवा

 हर्षे मन विसावले



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational