STORYMIRROR

Pratiksha chavan

Inspirational

3  

Pratiksha chavan

Inspirational

स्त्रीशक्ती जागर जाणिवांचा

स्त्रीशक्ती जागर जाणिवांचा

1 min
206

सतीच्या प्रथेला बळी त्या पडल्या,

स्त्रियांच्या भावना जिवंतच गाढल्या,

नाही विचार केला त्यांच्या मनाचा,

विचार केला त्या स्त्री असण्याचा l1l

 

           कित्येक वर्षे सतीसावित्री बनून जगली,

           दृष्टांच्या संहार करण्यासाठी दुर्गा ती बनली,

           नाही डगमगली, नाही घाबरली,

           तिच्या हक्कासाठी ती लढली l2l 


समाजाच्या विरोधात जाऊन शाळा ती शिकली,

पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून कामे तिने केली,

स्वतःच्या हिमतीवर नाव तिने कमवले,

या जगात स्त्रीचे अस्तित्व तिने टिकवले l3l 


            पुरुषाच्या मागे खंबीर उभी राहिली,

            सर्वांना लढण्याची प्रेरणा तिने दिली,

            जिजाऊ बनून शिवाजी तिने घडविला,

            सोनेरी अक्षरात इतिहास तिचा लिहिला,

            स्त्रीशक्ती जागर जाणिवांचा निर्मला l4l


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational