गावाकडचा पाऊस
गावाकडचा पाऊस
आला आला पावसाळा ,
चला चला गावाकडे |धृ |
हिरवे डोलते शिवार ,
रानी नाचते मोर ,
खेळतो वारा , पळते आभाळ ,
दिसते किती हे छान ।१।
पहिल्या पावसाचा थेंब ,
ओल्या धरतीचा सुगंध ,
शेतकऱ्यांच्या डोळ्यातील आनंद ,
पावसात भिजण्याची आवड ।२।
पावसात बेडकाचे येणे ,
मुलांनी गोगलगाईशी खेळणे ,
असे ही पावसाची गंमत ,
असे गावाकडची जंमत ।३।