STORYMIRROR

Pratiksha chavan

Inspirational

4  

Pratiksha chavan

Inspirational

स्त्रीशक्ती जागर जाणिवांचा

स्त्रीशक्ती जागर जाणिवांचा

1 min
368

सतीच्या प्रथेला बळी त्या पडल्या,

स्त्रियांच्या भावना जिवंतच गाढल्या,

नाही विचार केला त्यांच्या मनाचा,

विचार केला त्या स्त्री असण्याचा l1l 

          कित्येक वर्षे स्तीसावित्री बनून जगली,

          दृष्टांच्या संहार करण्यासाठी दुर्गा ती बनली,

          नाही डगमगली नाही घाबरली,

          तिच्या हक्कासाठी ती लढली l2l 

समाजाच्या विरोधात जाऊन शाळा ती शिकली,

पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कामे तिने केली,

स्वतः च्या हिमतीवर नाव तिने कमवले,

या जगात स्त्रीचे अस्तित्व तिने टिकवले l3l 

           पुरुषांच्या मागे खंभिर उभी राहिली,

           सर्वांना लढण्याची प्रेरणा तिने दिली,

           जिजाऊ बनून शिवाजी तिने घडविला,

           सोनेरी अक्षरात इतिहास तिचा लिहिला,

           स्त्रीशक्ती जागर जाणीवांचा निर्मला l4l


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational