हे जग कोणाचे?
हे जग कोणाचे?
आहे जग त्यांचे,
जे आहेत अंध,
न पाहिले जग,
ना मनात गंध l1l
आहे जग त्यांचे,
जो आहे अनाथ,
नाही आई-बाप,
तोची खरा नाथ l2l
हे जग कोणाचे,
गोरगरिबांचे,
न कोणा ते छळे,
गुण हे संताचे l3l
जग हे विरांच,
ना कधी ते हार,
सर्वांसाठी लढे,
मिळनी दे नारे l4l
हे जग सर्वांचे,
न कोणा अव्हेरू,
सांगे तो विधाता,
त्यांचे हे लेकरू l5l
जग आहे सर्व,
सृष्टी निर्मात्याचे,
दिला जन्म त्याने,
भाग्य हे आमचे l6l