स्त्री
स्त्री
'ती' असते आपल्या आयुष्यात
'ती' असते आपल्या जगण्यात
'ती'च्या शिवाय हालत नाही पान
'ती' तर असते घराची शान
'ती' लढते
'ती' हरते
'ती' पुन्हा उठते
आणि जिंकते
'ती' असते हसण्यात
'ती' असते रडण्यात
'ती' असते संवादात
'ती' राहते मनात
'ती' चा सहवास
असतो काही खास
'ती' देते आपलाही घास
नि प्रसंगी देते 'ती' श्वास
'ती' आहे दुर्गा
नि आहे 'ती' सावित्री
'ती'च लक्ष्मी सरस्वती
आहे 'ती' स्त्री
स्त्री एक प्रेरणा
'ती' आत्मा ह्या जगाचा
प्रकृती तिच्यात सामावली
करा आदर स्त्रीचा
