STORYMIRROR

Bharati Sawant

Inspirational

4  

Bharati Sawant

Inspirational

स्त्री-एक प्रेरणा

स्त्री-एक प्रेरणा

1 min
523

आई जरी असे माझा गर्भ

तुझ्या उदरातला मुलीचा

नकोस करू तिची तू हत्या

वाढवीन वंश मी बाळाचा


मोठी होऊन खूप शिकेन मी 

पायावर माझ्या राहीन उभी

ढळू देणार नाही तुझी मान

नेईन घराण्याचे नाव उंच नभी


नको मला सुखलोलुप जिणे

नकोत दागदागिने, अलंकार

मिळवीन ते माझ्या कर्तृत्वाने 

नाही जपणार कधी अहंकार


गरिबीचे चटके सोशीन पण

देईन मी आजन्म तुला साथ

बाबा आजीने त्रस्त केले तरी

सोडणार नाही मी तुझा हात


प्रसवुनी मज होती तुला कळा

फेडीन मी त्यांचे सगळे पांग 

तुझ्या सुखासाठी झटेन नित्य

तुझ्या आशाअपेक्षा मला सांग 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational