STORYMIRROR

Anupama TawarRokade

Tragedy

3  

Anupama TawarRokade

Tragedy

स्त्री भ्रूणहत्या

स्त्री भ्रूणहत्या

1 min
532

स्त्री भ्रुणहत्या हे पाप आहे

काळजाला पिळवटुन टाकणारा शाप आहे. 


आईच्या गर्भात नष्ट होते दुसरी आई

हिला गर्भात मारण्याची का करता घाई?


वंशाच्या दिव्यासाठी स्त्री भृणहत्या होते

स्त्री भ्रुणहत्येने वंशाची जननी नष्ट होते


जन्म तिला घेऊ देणे हा तिचा हक्क

पोटातच मारणं ह्या विचाराने मन होते थक्क


आईबाबांसाठी सारेच असतात सारखे

स्त्री भ्रुण का व्हावे आईबाबांपासून पारखे?


मायेची घागर अशी कुणी लाथाडता का?

जन्म घेण्याआधी आयुष्य कुणाचे संपते का?


चला थांबवू हे पाप सारे मिळून

या चिमुकलीसही जग पाहू देवू जवळून


घेऊ देऊ गगन भरारी या सानुलीला

चला प्रगती पथावर नेऊ या भारतमातेला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy