STORYMIRROR

काव्य चकोर

Classics

2  

काव्य चकोर

Classics

स्तोम

स्तोम

1 min
298

कितीही बोला पोटतिडकीने

बोलणे रुचेलच असे नाही..

रुचलेच कधी चुकून जरी

तरी ते पचेल असेही नाही..!!


जिथे पाहावे तिथे नुसती हातघाई

निष्क्रिय कृती अन् शाब्दिक लढाई..

बोलायची तर सोय उरली नाही

म्हणूनच तर मी काहीच बोलत नाही..!!


म्हणा लोकहो, तुम्ही खुशाल म्हणा

हे काही सबळ कारण नाही..

तसंही शब्दांशिवाय माझ्याकडे 

ठेवण्याजोगे प्रबळ तारण नाही..!!


पण तेही तरणार नाही ठाऊक आहे

त्यासाठीच तर काही बोलायचे नाही..

मुद्दा पटो ना पटो हा भाग पुढचा

पण शब्द नाहक सांडले जातील

ही भीतीही माझी अनाठायी नाही..!!


कारण झोपलेल्यास उठवता येते

पण झोपेचं सोंग घेणाऱ्याच काय..?

ही वृत्तीच अशी खेकड्याची आहे की..

कळणारही नाही 

कधी गुपचूप खेचतील पाय..!!


तरीही मन मारून मी मांडू पाहतोय

घुसमटलेल्या मनाचे निर्भीड विचार..

पण साशंक आहे अजूनही  

की करेल का कोणी (स)त्याचा स्वीकार..?


कारण काय लिहितोय ह्यापेक्षा आता

कोण लिहितोय/बोलतोय याला महत्व आलय..

व्यक्ती पूजेचंच स्तोम सर्वत्र माजतेय 

अन् भक्तांच्या मांदियाळीत 

नसलेल्या देवाचं चांगलंच फावतंय..!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics