स्तब्ध
स्तब्ध
लाट हिंदोळत येई,
येई गाज संगे तिच्या,
मज सांगे मीच आता,
गूज गोष्टी मनीच्या,
लाट समीप येतसे,
मी अबोल मात्र होई,
स्पर्शूनी क्षणात मला,
निघूनी लगेच जाई,
कळले न कधीही,
येऊन पुन्हा नव्याने,
ती जन्म घेई की,
मी मोकळा मनाने..
