STORYMIRROR

Pratik Dhawalikar

Abstract Inspirational

3  

Pratik Dhawalikar

Abstract Inspirational

निःशब्द

निःशब्द

1 min
14.2K


निःशब्द आहे मी,

कारण डोहात उमटलेल्या त्या तरंगांवर,

एक प्रतिबिंब हेलकावे घेत आहे

आणि कुठेतरी खोलवर,

एक अनामिक जाणीव,

माझं मन खात आहे,

की हे प्रतिबिंब माझचं आहे,

की आणखी कुणाचं?

निःशब्द आहे मी

कारण कालपर्यंत आपलासा वाटणारा किनारा,

आज अनोळखी धुक्यात धूसर झालेला आहे,

आता ना किनारा आपलासा वाटतो आहे,ना प्रतिबिंब,

मावळणाऱ्या क्षितिजवरचे रंगही,

आज एक मृगजळ वाटत आहेत,

दूर कुठेतरी आकाशात,

उत्तुंग विहार करणारा पक्ष्यांचा थवाही,

आज उदास वाटत आहे,

आणि एक अनामिक जाणीव,

माझं मन खात आहे,

की हे प्रतिबिंब माझचं आहे,

की आणखी कुणाचं?

निःशब्द आहे मी,

कारण अश्यातही सोबत करणारी,

सानशी नाजूक गार वाऱ्याची झुळूकसुद्धा,

आज अंगावर शहारे आणत आहे,

त्या बोचणाऱ्या वाऱ्यावर हिंदोळे घेत,

एक आर्त साद मला प्रश्नं विचारत आहे,

एक अनामिक जाणीव,

माझं मन खात आहे,

की हे प्रतिबिंब माझचं आहे,

की आणखी कुणाचं?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract