दिवेलागण
दिवेलागण
1 min
14.3K
उन्हें मालवली,
क्षितिजापल्याड गेली,
परतती थवे अन तिन्ही सांज आली,
दाटले रंग सारे अनामिक जागी,
जुन्या वेदनांची पुन्हा याद झाली,
विरल्या सावल्याही,
थकल्या,
निघून गेल्या,
अन डोळ्यांत आसवांनी मला साथ केली,
असे गूढ झाले निमिषात सारे,
दिवे लागणीची खरी वेळ झाली..
