स्तब्ध होणारे क्षण
स्तब्ध होणारे क्षण
किती स्तब्ध होतात क्षण
जेंव्हा असतोस तू जवळ
स्थिरावते काया कुशीत तुझ्या
नसते कसली हळहळ
साठत नाही काही शब्दांत
सुटतात भावनांचे ओहोळ
अडकवुनी स्पंदन माझे
मन पारध करून टाकते प्रेमाचे मायजाळ....

