STORYMIRROR

vaishali vartak

Abstract Children Stories Children

2  

vaishali vartak

Abstract Children Stories Children

सर सर पाऊस पडतोय रे

सर सर पाऊस पडतोय रे

1 min
10

सर सर पाऊस पडतोय रे

झर झर ओहळ वाहताती रे


नभातून बरसल्या जलधारा

मृद्गंध पसरवे थंड वारा

ओघळल्या मोतियांच्या सरी रे

खळखळ ओहळ वाहताती रे     1


दाटले अंबर काळ्या मेघांनी

दामिनी चमके रुपेरी रेघांनी

झाकोळलेल्या नभी दडे सूर्य रे

खळखळ ओहळ वाहताती रे      2


जागोजागी भरे खाच्यातून पाणी

नाचत खेळू गात पाऊस गाणी

ओंजळ भरुन धारा फेकू या रे

खळखळ ओहळ वाहताती रे      3


रान माळ हिरवेगार चहूकडे

नृत्य वनी मयुराचे पाहू गडे

इंद्रधनूची कमान नभात रे

खळखळ ओहळ वाहताती रे      4


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract