स्पर्धा करते मी कोणाशी
स्पर्धा करते मी कोणाशी
सुख आले दाराशी, पण दुःख पाठ ना सोडी
काळे ढग आले मनी, स्पर्धा करते मी कोणाशी
गडगडाट असतो नात्यांचा मनी
लखलखाट करती सदा अंगणी,
काळ्याकुट्ट ढगांनी मात केली जगण्यावर
असते ही सांजवेळ, किनारा सापडत नाही
काळे ढग आले मनी, स्पर्धा करते मी कोणाशी
क्षणात येतो सुगंध हा मातीचा
पण कळेना मला हा स्वार्थाचा का निस्वार्थाचा
प्रयत्न करत होती ना ते पुन्हा जुळण्याशी
सलगी करते वाऱ्यापरी मनाशी
काळे ढग आले मनी स्पर्धा करते मी कुणाशी
आडोसा शोधते पण सापडत नाही
रोमारोमात धडधडी पुन्हा भरली ही नात्याची
गट्टी जमली माझी या मुक नात्याशी
किनारा मिळतो पण संजय नाही
काळे ढग आले मनी स्पर्धा करते मी कोणाशी

