स्पर्धा : दिपोत्सव
स्पर्धा : दिपोत्सव
सुट्टीची गोडी
असते वेगळी
मजाच आगळी
सर्वांना जोडी
सुट्टी देतसे
आराम तनाला
विसावा मनाला
निद्रा घेतसे
दिवाळी सण
मिळतो आनंद
जोपासावा छंद
सुखाचे क्षण
सुट्टी सांगते
चला फिरायला
शिका जगायला
वाट दावते
घरात आई
सदा असे व्यस्त
होते कधी त्रस्त
सदैव घाई
सुट्टीत घ्यावा
मोकळासा श्वास
आनंद हा खास
मनी रहावा
