STORYMIRROR

jaya munde

Inspirational

3  

jaya munde

Inspirational

सोपं आहे

सोपं आहे

1 min
167

    सोपं आहे दुःखाला ही

     हसत झेलणे,

     आयुष्याच्या उंबऱ्याला

    संयमानेच सावरून चालणे.


   जग दावितसे क्षिती

    हिंमत धरावी,

   जीवनाच्या परीसाला

प्रयत्नांच्याच शर्थीने झुंज द्यावी.


  नको रडगाणे आता

  ऊद्धारू स्वतःला,

 यशरूपी दर्पणात

  देऊ या झोकून पुन्हा सर्वस्वाला.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational