सोंगटी
सोंगटी
जग भव्य सारीपाट
खेळे आयुष्य सोंगटी
उभी आडवी ती चाल
दिव्य परिक्षा गोमटी
मन चंचल बावरे
पांग अस्तित्व शोधत
सुप्त स्वप्ने रननीती
सुख दुःख शृंगारत
झुले चंदेरी स्वप्नात
वाट सुगंधी मधुर
डाव हा क्षणभंगुर
हार जीत हूरहूर
निमिषाची पखरण
प्रेम विवाह सोहळा
मनी ध्येय निरंतर
सृष्टी बहरे प्रांगण
स्मृती गंध जन्मातरी
नक्षत्रात सजलेले
वाहे अमृताचे झरे
जग प्रेम जिंकलेले
