सोहळा प्रेमरंग दिव्याचा...
सोहळा प्रेमरंग दिव्याचा...
हाक मनातल्या गोंधळाची ऐकूनी
भावनांच्या किरदाराला देऊ दुजोरा
सुंदर कळ्यांना जरा मनी नाचवू प्रेमात
खिळलेल्या नजरांचा या सजवू फुलोरा
क्षणाक्षणाच्या प्रेमळ दिलदार आठवणी
प्रेमावरती चला जरा शब्दात बोलू काही
हास्यात मिटलेल्या डोळ्यात प्रित लपवू
छंदात प्रेमाच्या तेजदीप बोलू काहीबाही
गंधात विचारांच्या जुळल्या गाठीभेटी
विश्वासात गवसते विश्वरुप आयुष्याचे
रसाळ खट्याळ जग संसाराचे फुलते
प्रेमप्रित न्हाहते स्वप्नांच्या सानिध्याचे
रंगात निःस्वार्थाचा रम्य खुलुनी मळा
राग, द्वेषाचा विशाल हृदयाचा मेळा
एकमेका साथीत मिसळुनी घालतो पिंगा
नावलौकिकाचा सजतो दिव्य सोहळा

