STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Classics Others

4  

Sanjay Raghunath Sonawane

Classics Others

संत भगवान बाबा-गीत

संत भगवान बाबा-गीत

1 min
192

भगवान बाबांच्या जयंतीला,भगवान गडाच्या तिर्थाला 

जनसागर उसळला,सोहळा बाबांचा पाहण्याला 

झाला आनंद मनाला,सार्या भक्त जनाला 

भगवान बाबांच्या कार्याला,भगवान गडाच्या मातीला 

 

भगवान बाबा प्रेरणास्थान, समाजाचे श्रद्धास्थान 

आदर्श संत जीवन,एकता समतेचे पवित्र स्थान

दैवत वंजारी समाजात, महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात 

रुजविले विचारधन, जपले समाजबांधवानं 


नव्ह्ता लोभ धनाचा,नव्ह्ता लोभ पदाचा 

विचार थोर मनाचा,संत जीवन कार्याचा 

सोसला वेळोवेळी अपमान,शब्द जहाल विषासमान 

राखण सत्याची करून,सिद्ध केले संत मन 


भगवान गडाच्या क्षेत्राला,टाळ मृदंग वाजला 

रामकृष्णहरी गजर झाला,पुजले बाबांच्या प्रतिमेला 

दरवर्षीच्या वारीला,बाबांच्या चरणाला 

आशीर्वाद बाबांचा घेण्याला,शान गडाची राखण्याला 


जपलंय आदरानं वास्तुला,पिढ्या पिढ्यांनं गडाला 

समाज प्रबोधन करण्याला,विचारधारा शुद्ध मनाला 

संघर्ष जगताना झाला,पात्र झाले सत्त्व परीक्षेला 

झाली तुमची अग्निपरीक्षा,महायोगी युगपुरुषा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics