STORYMIRROR

Sanjay Kanhav

Inspirational

3  

Sanjay Kanhav

Inspirational

संस्कृतीचा झरा

संस्कृतीचा झरा

1 min
156

भारतीय संस्कृतीची,

महानता आहे जगी ।

योग अर्पुनी जगाला,

झाले संत योगी जोगी ।।


मान लहानथोरास,

स्नेह अंतरी फुलला ।

वारकरी संप्रदाय,

भाव भक्तीचा भुकेला ।।


कृष्णा सुदाम्याची मैत्री,

राधा मीराईची भक्ती ।

सेवा ती पुंडलिकाची,

अशी महान संस्कृती ।।


आल्या अतिथा पूजतो,

सेवाव्रत घेतो हाती ।

जरी गरीबाची झोळी,

तृप्त करतो अतिथी ।।


नववारी साडी वस्त्र,

कुंकू शोभते ललाटी ।

पतिव्रता धर्मभाव,

नारी सोज्वळ गोमटी ।।


सण उत्सव विविध,

होळी दसरा दिवाळी ।

स्नेह गोडी आपुलकी,

वाजविते सुखी टाळी ।।


सत्य अहिंसा जपुनी,

दिला जगी मूलमंत्र ।

महात्मांची शिकवण,

शत्रू नको, होऊ मित्र ।।


सर्वधर्म समभाव,

हिंदू मुस्लिम ख्रिश्चन ।

राजा जाणता शिवाजी,

सर्वधर्म मंत्रीगण ।।


माझ्या मातीच्या कुशीत,

संस्कृतीचा वाहे झरा ।

सानथोरा मान येथे,

अवमाना नसे थारा ।।


श्रद्धा भाव भक्ती पूजा,

इथे शांततेचा ठेवा ।

म्हणूनच जगालाही,

वाटे भारताचा हेवा ।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational