गावाकडील पाऊस
गावाकडील पाऊस
1 min
14.1K
गावाकडील पाऊस
फार त्याचा गडगडाट
रुबाबदार थाट
जागोजागी
गर्दनिळे मेघ
बरोबर विजांचा कडकडाट
बरसते लाट
मुसळधार
बालगोपालांची मस्ती
थैमान घालती पावसात
पाऊसगाणे गात
उनाडती
चिखलांचे रस्ते
शेत फुलते हिरवेगारं
मनातही वारं
प्रत्येकाच्या
झरे नाले खळाळती
तुडुंब पाणी शेतात
शेतकरी आनंदात
नांगरती
आकाशातील इंद्रधनू
पाहून नाचतो मोर
सुंदरीची चंद्रकोर
हासतसे
गावातील पाऊस
असा भरतो मनात
हिरवाई रानात
शोभतसे
