STORYMIRROR

Sanjay Kanhav

Tragedy Children

3  

Sanjay Kanhav

Tragedy Children

प्रेम आईचे

प्रेम आईचे

1 min
127

भूक लागता लेकरा,

फुटे आईला रे पान्हा ।

वात्सल्याची मूर्ती आई,

भिजे प्रेमात हा तान्हा ।।


रात्र रात्र जागते ती,

शांत निजवाया बाळा ।

बोलण्यास शिकविते,

आई हीच खरी शाळा ।।


प्रेम आईचे निस्वार्थ,

जगी नाही त्याला तोड ।

स्वतः उपाशी राहून,

घास भरवते गोड ।।


मित्र मैत्रिणींचे प्रेम,

भावा बहिणीचे तेच ।

पती पत्नीच्या नात्यात,

लागे स्वार्थाची रे ठेच ।।


बाळ होई जरी मोठा,

तिच्यासाठी तोच सान ।

आशीर्वाद सदा देते,

राजा होवो रे महान ।।


पुत्र गेला दूर जरी,

त्याच्यासाठी दुवा करी ।

प्रेम आईचेच खरे,

गोड तिचीच भाकरी ।।


இந்த உள்ளடக்கத்தை மதிப்பிடவும்
உள்நுழை

Similar marathi poem from Tragedy