संकट पडला असता मार
संकट पडला असता मार
सोबत नसते जर माझे यार
तुझ्या प्रेमात पडला असता मार....
बसलो बेरोजगारीच्या महेफीलीत
तूझं प्रेम जाळलं मित्रांच्या चुलीत
जिव्हारी लागला तुझ्या दग्याचा वार.....
इंस्टाग्रामवरची पाहून तूझी फोटो
मला वाटलं लागली प्रेमाची लोटो
खिसा रिकामा केला लुटून नेलं सार.....
मला दिला तू चांगला प्रेमात निरोप
लावले गं तू माझ्यावर किती आरोप
विश्वास बसेना तू केलं माझं चीत गार.....
संगमला सोडून तू नांदतेस सुखात
आठवणींत तुझ्या जाईना घास मुखात
अगं आता शोधतो मी आणखी कोणी नार....
