संकल्प
संकल्प
आले एकवीस वर्ष
केला नवा मी संकल्प
सदा असेन तत्पर
नेण्या सिद्धिस प्रकल्प.
वाणी गोड मी बोलेन
सदा शांतता राखीन
लोका मदत करीन
सुखी त्यांना मी पाहीन.
ज्ञानकार्य ते देण्यास
वेळ माझा खर्चीणार
लोक कल्याणास सदा
हात पुढे करणार.
परिसर स्वच्छ माझा
ठेवण्यास मी झटेन
स्वच्छ भारताच्या कार्या
अशी मदत करेन.
झाड लावा नी जगवा
अभियान मी करीन
हिरवाई रान सारे
माझ्या गावात दावीन.
संकल्पाची मांदियाळी
रचलीय नव वर्षा
देवा तुझ्या मदतीने
यश मिळो ते सहर्षा.