Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Nilesh Bamne

Romance

3  

Nilesh Bamne

Romance

संकल्प...

संकल्प...

1 min
229


तिच्यासमोर प्रेम व्यक्त करण्याचा

काही केल्या कधी पूर्ण झालाच नाही

वर्षे बदलत गेली आणि

प्रत्येक वर्षातील ती ही बदलत गेली

कॅलेंडरसारखी...

कॅलेंडरच्या नावासारखा मी एकच होतो

फक्त बदलेल्या वर्षासारखी ती होती.

त्या कॅलेंडरसारखे माझे ही अंतरंग

प्रत्येक वर्षी बदलत होते...

मी प्रत्येक वर्षी नव्याने दुसरीच्या

प्रेमात पडत होतो...

प्रेम व्यक्त करण्याची

हिंमत गोळा होईपर्यत

ती दुसऱ्याची होत होती 

ती दुसऱ्याची झाल्यावर

एक वर्ष संपत असे...

असेच संकल्पा मागून संकल्प

अपूर्णच राहत होते...

कदाचित संकल्प हा

पूर्ण करण्यासाठी नसतोच

असेही वाटून जायचे

प्रत्येक वर्षाच्या

शेवटच्या दिवशी ...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance