तो
तो
1 min
221
आता कोठे सावरत होतो मी
आनंदाचे काही क्षण वेचत होतो मी
सरलेल्या दिवसांची आठवणही मला नको होती.
म्हणून नव्या आठवणी तयार करत होतो मी
पूर्वी क्षणाला क्षणाला वाटणारी भीती
आता कोठे विसरू पाहत होतो मी
तो गेला माझ्या आयुष्यातून म्हणून
उत्सव साजरा करत होतो मी
तो येतोय परत या कल्पनेने
अर्धमेला आता होत होतो मी .....
