हिवाळा...
हिवाळा...
1 min
202
तापलेला तनाला
जेंव्हा हवा असतो गारवा
तेंव्हा नेमका सुरु होतो हिवाळा...
देहाच्या मिलनाला देह
क्षणभर जवळ जाता
हवा हवासा वाटतो हिवाळा...
तापलेला मेंदुलाही
हवा असतो जेंव्हा थंडावा
तेंव्हा कामी येतो हिवाळा...
व्यापून आहे प्रेम जगी
पण उफाळून यायला
लागतो फक्त आणि फक्त हिवाळा...
नाही रंग तसा
कोणताच कोणत्याच ऋतूला
पण असतो असतो गुलाबी हिवाळा...