STORYMIRROR

Nilesh Bamne

Inspirational

3  

Nilesh Bamne

Inspirational

देह...

देह...

1 min
196

झाले असेल तुझ्या देहाचे

त्याच्या देहाशी मिलन

पण आजही तुझ्या देहाचे

आकर्षण आहे माझ्या देहाला

देहाचे ते देहाला काय

आकर्षण असावे कळत नाही मला

तुझ्या आणि माझ्या

देहातील तत्वे सारखीच आहेत

तुझ्या आणि माझ्या शरीरातील

फक्त काही अवयव निराळे

फरक पाहिला तर कदाचित

सुंदर दिसण्याचा असेल

एकाच मातीतून घडलेल्या

दोन मुर्त्या सारख्या कोठे घडतात

तुझ्या देहाशी ज्या देहाचे मिलन झाले

तो देह ही काही वेगळा नाही

त्या देहालाही तेच अवयव आहेत

जे माझ्याही देहाला आहेत

फरक फक्त इतकाच

आमची कर्मे निराळी आहेत

पण आपले तीनही देह

शेवटी मिळणार एकाच तत्वात

त्यातून जन्माला येतील

पुन्हा पुन्हा नवीन देह

पण भावना तीच असेल

एक देह मिळविण्याची


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational