Win cash rewards worth Rs.45,000. Participate in "A Writing Contest with a TWIST".
Win cash rewards worth Rs.45,000. Participate in "A Writing Contest with a TWIST".

Nilesh Bamne

Romance


3  

Nilesh Bamne

Romance


माझ्या ३०० चारोळ्या

माझ्या ३०० चारोळ्या

15 mins 352 15 mins 352

यशाचे मूल्य त्याग असते

त्यागाचे मूल्य प्रेम असते

प्रेमाचे मूल्य जीवन असते

जीवनाचे मूल्य अमूल्य असते...


मी पोहचत नाही

माझी बदनामी पोहचते

मला लोकांच्या नजरेत

रोज मोठ करते...


पौर्णिमेचा चंद्र आज

फारच जवळ आला

माझ्या प्रियेचा मुखडा

त्यात मला दिसला...


तू दिलेल्या जखमेवरील

खपली काढायला हवी

ती काढणारी आता

मला शोधायला हवी ...


प्रेमाच्या पिंजऱ्यात बंदी

मी पोपट झालो

तुझ्याशी गोड बोलण्यात

मी गुंग झालो...


मला आकर्षण तुझे

तर कधीच नव्हते

हे त्याने मला

तुझ्या प्रेमात पाडले...


तुझ्यावर चारोळ्या मी

रोज लिहित गेलो

माझ्या तुझ्यावरील प्रेमाचे

भांडवल करीत गेलो...


मी पतंग तू माझी दोर आहेस

फिरकी आपली आता त्याच्या हातात आहे

तू माझ्यापासून कदाचित दूर होणार आहेस

कटी पतंग मी स्वैर होणार आहे...


तुला भोळी समजता

मी खुळा झालो

तू जगी हुशार

मी वेडा झालो...


माझा शाप आहे तुला

माझ्याशिवाय तू जगणार नाहीस

मी जग सोडून गेल्याशिवाय

तू हे जग सोडणार नाहीस...


समजू नकोस तू

सारे विचित्र आहे

तू माझीच होणार

अगोदरच ठरले आहे...


माझ्या मनात जे असते

ते त्याच्याच मनात असते

ते जगाला दिसत नसते

जग उगाच भ्रमात असते...


माझा जन्म या जगी

उगाच झाला नाही

माझ्यासाठी आता या जगी

काहीच उरले नाही...


समजू नका मला

वेड लागले चारोळ्यांचे

मला वेद लागलेत

आता माझ्या प्रेमाचे...


अकल्पित घटना घडेल

तू माझी होशील

मी तुझा होईन

जग आपले होईल...


तू माझी नाहीस

मी तुझा आहे

हे शरीर माझे

आत्मा त्याचा आहे...


कोठून माझ्या मेंदूत शिरलीस

माझ्या मनात तू नसताना

माझ्या हृदयाचा ताबा घेतलास

त्यावर कित्येक बसलेल्या असताना...


तुझे सौंदर्य सोडले तर

तुझ्यात काय आहे देण्यासाठी

कोणी येईल तुझ्या आयुष्यात

फक्त तेच तुझ्याकडून घेण्यासाठी...


पलीकडे जाऊन प्रेम कसे करायचे

हे तुला कसे कळणार अलीकडे राहून

तू ठरविलेच आहेस बाहुले व्हायचे

सहन करायचे सारे आयुष्यभर मूक राहून...


त्याच्या आयुष्याचा निर्णय घेणे

आपल्यासाठी फार सोप्पे असते

कारण त्याचे आयुष्य तसेही

फक्त त्यालाच जगायचे असते...


तुझ्या प्रेमात मी जगलो

काही स्वप्नवत क्षण

त्या क्षणांची शपथ मला

तुझ्यासाठी काही पण ...


माझ्यावर प्रेम करणारी ती

कोण कशी कोणी का असेना

तिच्या माझ्यावरील प्रेमासाठी मी

सारेन बाजूला कोणी का असेना ...


एकदा प्रेमात पडावं

रोज थोडं झुरावं

हळू हळू मरावं

मेल्यावर थोडं उरावं...


जन्म तुझा जगण्यासाठी

जन्म माझा मरण्यासाठी

जन्म तुझा झिजण्यासाठी

जन्म माझा उरण्यासाठी...


तुला मिळविण्यात मला रस नाही

तितका माझ्यात आता रस नाही

तुझ्या प्रेमात मला रस नाही

तुझ्या प्रेमात आता रस नाही...


तुझ्या मनात मी

तुझ्या तनात तू

तुझ्या स्वप्नात मी

तुझ्या जगात तू ...


माझे शब्द फुलं होती

तू त्यांचे काटे केलेस

माझी कविता प्रेम होती

तू तिचे अश्रू केलेस...


प्रेमाच्या चक्रव्यूहात शिरलो

मी अर्धवट ज्ञानाच्या जोरावर

पूर्ण ज्ञान असते

तर स्वार असतो प्रेमावर...


संयम माझे शस्त्र आहे

मोह माझ्या अधीन आहे

विचार माझी ओळख आहे

प्रेम माझे जगणे आहे...


प्रेम करावं तर

जगाने दखल घ्यावी

तुम्ही करत रहावं

जगाने पावती द्यावी...


भौतिक सुखे हवी तुला

मला काय माहीत सारी

प्रेम उगाच दिले तुला

तुला हवी असताना तिजोरी...


तुझ्या मनात काय होते

मला माहीत नाही

माझ्या मनात तेच होते

तुला माहीत नाही...


माझ्या आत दोघे राहतात

एक कवी दुसरा लेखक

एक माझ्यातील प्रियकर असतो

दुसरा असतो फक्त लेखक...


माझ्यातील कवी तुझ्या प्रेमात पडला

लेखक कधीच नाही त्यास भुळला

माझ्यातील कवी प्रेमाशी एकरूप झाला

तू भेटशील आता माझ्यातील लेखकाला...


तुझ्या मनात नेमकं

माझ्याबद्दल काय चाललं होतं

एकदा कळलं असतं

माझं मन दुसरीकडे वळलं असतं...


जग मरते माझ्यावर

तुझ्यावर मी मरतो

तू मरतेस कोणावर

जगावर मी मरतो...


आपल्यात नाते एकच प्रेमाचे

आयुष्यभर तेच आपण मानायचे

देहाने कायम दूर रहायचे

फक्त मनाने एकत्र यायचे...


देहाचे देहाशी मिलन होते

आजच्या या नश्वर जगात

आत्मा विस्मृतीत गेला आहे

आजच्या या भोगी जगात...


तू माझी नाहीस

मी तुझा आहे

तू बाहुली नाहीस

मी बाहुला आहे...


मी क्षितिज आहे

तू मृगजळ आहेस

दोघे दिसतो जगाला

तरी भास आहेत...


तुझे आणि माझे

स्वप्न एक असते

आपण एकत्र असतो

जग विरोधात असते...


माझे प्रेम चंद्रासारखे

कलेकलेने कमी होणारे

कमी होत जात

आमवस्येला अदृश्य होणारे...


तू मांजर

मी वाघ आहे

तू नदी

मी सागर आहे...


आता माझी सकाळ

यशावर स्वार झाली

रात्रीची स्वप्ने सारी

आता इतिहास झाली...


आणखी एक आता

माझी चारोळी झाली

अश्या कित्येक चारोळ्यांची

माझी कविता झाली...


माझ्याशी मौनाची किंमत

तुला आता नाही कळणार

भविष्यात कळेल जेंव्हा

तेंव्हा मी मौनात असणार...


मी नाही आता

तुझ्या प्रेमात पडणार

मी पुढे धावणार

तू मागे लागणार ....


तो सिंगल

ती सिंगल

म्हणून झाले

दोघे कपल...


बदलले काहीच नाही

फक्त तू बदललीस

माझ्या हृदयातील जागा

तुझी तू सोडलीस...


मी चारोळीत रमणार नाही

कविता माझी वाठ पाहतेय

मी चारोळीवर प्रेम करतोय

कविता माझ्या प्रेमात पडलेय...


पहिल्यांदा माझे फुलपाखरू

चुकीच्या फुलावर बसले

त्या फुलाने माझ्या

फुलपाखरालाच फस्त केले..


प्रेमात पडणे चूक नाही

चुकीच्या प्रेमात पडणे नको

प्रेमात गुंतवणे ठीक आहे

त्याच्यात उगाच मरणे नको ...


हल्ली येणारी प्रत्येक सकाळ

माझ्यासाठी चारोळ्या घेऊन येते

तिला विसरायचे ठरते रात्री

सकाळी ती चारोळ्या होते...


फुलपाखरू फुलांच्या प्रेमात पडते

प्रेमात फारच थोडे जगते

आकर्षण जगाला फुलांचे असते

पण प्रेमात फुलपाखराच्या पडते...


जग ज्याला प्रेम म्हणत

ते प्रेम कधीच नसतं

प्रेम पेटता दिवा नसतं

ते पेटलेली मेणबत्ती असतं...


मी चारोळीच्या प्रेमात पडलोय

तिच्यासारख्या तुझ्यात नाही

मी चारोळीत रमलोय आता

तुझ्यात रमणार नाही...


मी प्रेमात पडलो आहे

अजून वाया गेलो नाही

मी जगाला सोडले तरी

जगाने मला सोडले नाही...


मी नाही बदललो

तू बदललीस जगासाठी

मी तिथेच होतो

तू धावलीस जगासाठी...


तू मोकळी आहेस

तुझी तीच वाट चालायला

मी मोकळा होईन

माझ्या यशाचा मार्ग धरायला...


धोकेबाज आहेत डोळे तुझे

मुख मोहिनीचे आहे तुझे

मन चंचल आहे तुझे

मृगजळ आहे अस्तित्व तुझे...


तुझ्या मनात काय

होते नव्हते माहित नाही

माझ्या मनात आजही

काही निराळे नाही...


तुझी अडखळणारी जीभ

आता बोलू लागली

माझ्या प्रेमाच्या विरोधात

आग ओकू लागली...


जगणे नकोसे झाले

मरणे नको आहे

जगणे तुझ्याविना आता

कल्पना नको आहे ...


पुढे टाकलेले पाऊल

मागे घेत नाही

व्हायचे ते होऊदे

आता तमा नाही...


स्वप्नातला माणूस नको

स्वप्न हवं असतं

स्वार्थी जगात या

फक्त हवं असतं...


जे होणे नाही

ते करणे नाही

व्यर्थ वेळ नाही

वाया घालणे नाही...


शब्द सारे माझे

आज आश्रू झाले

डोळ्यात जमा झाले

प्रेम वाहून गेले...


तू असलीस जरी

माझ्या स्वप्नातील परी

तू नाही मला

माझ्या कवितेपेक्षा प्यारी....


आजची सकाळ माझ्यासाठी

सुंदर विचार घेऊन आली

जग म्हणाली जगासाठी

समज ती तुझी झाली...


या जगात दोघेच जन्मतात

एक दुसऱ्या सोबत जगण्यासाठी

बाकी सारे निमित्त असतात

नाते त्यांच्यातील निर्माण करण्यासाठी...


मोहातून मी बाहेर आलो

तू आता मोहात पडलीस

मी आता मुक्त झालो

तू जगात गुंतून पडलीस...


देवाने मला संधी दिली

स्वतःला सिद्ध करण्याची

मी देवाला संधी दिली

त्याला सिद्ध करण्याची...


तू शुल्लक होतीस माझ्यासाठी

प्रेमाने तुला मोठं केलं

मी शुल्लक झालो तुझ्यासाठी

प्रेमाने मला लहान केलं...


माझे प्रेम प्रकाश आहे

जग आडवू शकणार नाही

तुझ्या मनात अंधार आहे

तोवर प्रकाश पडणार नाही...


तू राहतेस मूर्खांच्या जगात

मी रहातो बुद्धिजीवी लोकांत

तू जगतेस अभासी जगात

मी जगतो फक्त वास्तवात...


एक बंध होता माझ्याभोवती

तो आता सैल होणार आहे

मी पुन्हा मुक्त जगासाठी

आता नव्याने जगू पाहणार आहे...


तुझ्या प्रश्नांची उत्तरे

सारी आहेत माझ्याकडे

तुला विचारायचा तर

एकच प्रश्न माझ्याकडे...


तुझी किंमत तूच ठरव

मी तुला संधी देतोय

तुला जगाचे होऊन रहायचंय

की जगाला तुझे करायचंय...


माझ्यापासून दूर पळून

काही मिळणार नाही

जे मिळेल पळून

ते टिकणार नाही...


माझ्या प्रेमाची तुला खबर नसली

तरी जग बेखबर नाही

माझ्या प्रेमाची कवाडं उगडी असली

की शिरणारे कमी नाही...


जग बदलत क्षणात

तू ही बदललीस

मी बदलणार नाही

तू मला बदललीस ...


माझे धावणे थांबले आहे

चालणे सुरु झाले आहे

तिचे धावणे सुरु आहे

चालणे थांबले आहे...


मला संधी नाही

जगात मोठं होण्याची

तुला संधी आहे

मला साथ देण्याची...


तुझ्या डोळ्यात जे दिसत

ते मनात नसतं कदाचित

माझ्या डोळ्यात जे असतं

ते तुला दिसतं कदाचित...


आज सकाळ झाली

नवीन दिवस घेऊन

तुझ्या स्वप्नांना आता

राम राम करून...


भूत भविष्य आणि वर्तमान

जर जगात स्थिर असेल

तर त्या स्थिरतेत तुला

माझी जन्मभर सोबत असेल...


जगाला संभ्रमित करणारे आहे

तुझे आणि माझे नाते

तुझे प्रेम माझ्यावर नसतानाही

मला तुझ्या प्रेमात पाडते...


तुझ्या नकळत मी

तुझ्या प्रेमात पडलो होतो

तू ही पडशील

या भ्रमात मी होतो...


कोणालाही न सुटलेलं

कोड मी सोडवतोय

ते सोडविण्यासाठीच मी

आता तुझ्यात गुंतलोय...


तुझ्या नश्वर देहात या

काही नाही माझ्यासाठी

माझे मन गुंतले तुझ्यात

हे पुरेसे माझ्यासाठी...


आता सारे संपले आहे

माझे प्रेम आटले आहे

कोरड्या जगात बसलो आहे

तहानेने प्रेमाच्या व्याकुळ आहे...


मी चंद्र तू तारा आहेस

चांदण्या माझ्या प्रेमात आहेत

तू एकदा गळून पडणार आहेस

चांदण्या तुझ्यावर हसणार आहेत...


खऱ्या प्रेमाला या जगात

खरंच कशाचीच गरज नसते

हे कळते साऱ्या जगाला

वेळ निघून गेलेली असते...


मी तिला माझी समजत होतो

ती तर परग्रहवासी होती

मी तिच्या प्रेमात पडलो होतो

ती तर यंत्रमानव होती...


माझ्या एका तत्वासाठी

मी तिला सोडला

माझ्या दुसऱ्या तत्वासाठी

समज तुला सोडला...


उगाच भोळी होऊ नकोस

तुझे मन जाणतो मी

उगाच फार लाजू नकोस

जगाचे चेहरे वाचतो मी...


मला स्त्री नको

फक्त मैत्रीण हवी

माझ्या विचारांची झोळी

तिने सांभाळायला हवी...


प्रेमाच्या बाबतीत मी जाड कातडीचा

पाषाण हृदयी गेंडा झालो होतो

तू गुलाबाचे फुल होऊन आलीस

म्हणून मी फुलपाखरू झालो होतो...


एका दगडाला मी हिरा समजून

पैलू पडायला निघालो होतो

त्या दगडाचा हिरा झाला नाही

माझा दगड झाला होता...


तू ही शेवटी गणित मांडलस प्रेमाच

जे मी तर केव्हाच सोडवल होत

जन्मात सुटणार नाही तुला असं

एक गणित मी केव्हाच सोडवल होत...


मी दिसतो तसा नाही

तू दिसतेस तशी नाही

तू कोवळी काकडी नाही

मी गोळ भोपळा नाही...

कुत्री - मांजरी

जगतात स्वतःसाठी

जगा एकदातरी

समाजातील उपेक्षितांसाठी...

एक इशारा तिचा

जीवन बदलून गेला

माझ्या जीवनाला नवा

अर्थ देऊन गेला...

मी पाया पडलो

तू पाया पडलीस

मी सहज वळलो

तू गोड हसलीस...

तुझ्या माझ्यातील अंतर

आता कमी होणार नाही

माझ्या मनातील तुला

आता कधीच कळणार नाही...

चक्रव्यूह भेदून आत गेलो

मी अकल्पित विचारांचे

त्या चक्रव्यूहात तू होतीस

घेण्यास प्राण माझे...

तनाशी न घेणं मला

मनाशी न घेणं तुला

त्याच्याशी न घेणं मला

माझ्याशी न घेणं तुला...

जगाची सारी बंधने तोडून

मी तुझा झालो असतो

तुझ्या डोळ्यात मला जर

एकदाच मी दिसलो असतो...

मी काय करायचं

तुम्ही नाही ठरवायचं

तुम्हालाच होत ठरवायचं

मला नव्हतं जन्मायचं...

माझा मित्र मला म्हणाला

कोणाच्या मागे राहू नकोस

रहायचे तर पुढे रहा

कोणाच्या मागे लागू नकोस

माझे सौंदर्य आणि कुरुपता

जिने दोन्ही पाहिले आहे

तीच आहे माझी प्रेयसी

जिने मला पाहिले आहे...

पहाटेचा रविकिरण रोज

तुझी आठवण घेऊन येतो

प्रेमाने मला स्पर्शून

सुप्रभात...म्हणत जाग करतो...

माझी कविता बदलली

माझी ती बदलली

माझी स्वप्नातील परी

माझी नजर झाली...

माझी कविता बदलली

माझी ती बदलली

माझी स्वप्नातील परी

माझी नजर झाली...

तुझ्या प्रेमात पडलोय कधीचा

वर झाकण नात्याचं होतं

आता नसतो दिसलो तुला

तर मरण पक्क होतं...

तुला कधीच कस वाटलं नाही

एकदातरी माझ्याशी बोलावे प्रेमाने

तू माझ्या खूप जवळ होतीस

चंद्राजवळील त्या चांदणी प्रमाणे...

माझ्या चारोळ्या तुझ्यापर्यंत

कधीच पोहचणार नाहीत...

स्वार्थी जगातील तू

त्या वाचणार नाहीस...

आता माझी चारोळी खरंच

प्रेमातून वास्तवात जाणार

चार दिवस संपले प्रेमाचे

आता वास्तव मांडणार...

लेखकांचे पुतळे आता

अदृश्य व्हायला लागले

लेखकांचे विचार मनात

पिंगा घालायला लागले...

एक सकाळ गेली

दुसरी पहाट झाली

सकाळ रोज होते

आज पहाट झाली...


सुटत नाही एक कोडं

मला याच जन्मीचं

खरंच असतं काही नातं

आपलं कोणाशी गतजन्मीचं...


तू माझ्या प्रेमात पडणे

हे नैसर्गिक होते

मी तुझ्या प्रेमात पडणे

माझ्यासाठीही अकल्पित होते....


तू माझ्या आकर्षणाचा

विषय नाहीस

तरी माझ्या मनातून

जात नाहीस...


तू तर बोलणार नाहीस

मी ही बोलणार नाही

आपले प्रेम अबोल राहणार

कोणाला कधीच कळणार नाही...


तू माझ्या हृदयात

कोणत्या भोकातून शिरलीस

कि अजून त्यातून

बाहेर नाही पडलीस...


तू मृगजळ माझ्यासाठी

मी वेडा तुझ्यासाठी

जग धावेल तुझ्यासाठी

मी धावेन जगापाठी...


जगायला निमित्त भेटले

तुझ्या प्रेमात पडण्याचे

नसती भेटलीस तू

जीवन संपले असते...


माझे तुझ्या प्रेमात पडणे

म्हणजे माझ्यात प्रेम जागणे

प्रेमातच तुझ्या आता मरणे

जमले तर तुझ्याशिवाय जगणे...


काही जन्मतात जगण्यासाठी

काही जन्मतात मरण्यासाठी

मी जन्मलो तुझ्यासाठी

फक्त तुझ्यावर मरण्यासाठी...


तुझी किंमत जगाला

कधीच कळणार नाही

तुझ्याकडे जग माझ्या

नजरेने पाहणार नाही...


तुझ्यावर चारोळ्या लिहिल्या मी

अशी कशी तू

एक ओळ वाचली नाहीस

अशिक्षित कशी तू ...


भ्रम आहेस तू

माझ्या कल्पनेतला

वास्तव आहेस तू

असून नसलेला...


माझ्या जवळ असतानाही

तू माझ्यापासून दूर होतीस

माझ्या विचारात होतीस

पण माझा विचार नव्हतीस ...


तू माझी होणार नाही

मी तुझा होणार नाही

तू झालीस दुसऱ्याची तरी

मी दुसरीचा होणार नाही...


प्रतिभा होती

कविता होती

कथा होती

ती होती...


प्रेमात मी हजारदा पडलो होतो

पण प्रत्येकवेळी सावरलो होतो

आता कदाचित मी सावरणार नव्हतो

नव्याने प्रेमात पडणार नव्हतो...


मी चारोळ्या कोणावर लिहल्या

कधी कोणाला कळणार नाही

चुकून कळलच कोणाला तर

तो जगाला सांगणार नाही...


प्रेमात पडावं तर

जमिनीने आकाशाच्या

मी तुझ्या तर

नदीने समुद्राच्या...


सारं समजून उमजून मग

काही प्रेमात पडतात

मला वाटत ते फक्त

जीवनाच गणित मांडतात...


कोण म्हणत तू वेडी आहेस

कोण म्हणत तू भोळी आहेस

कोण म्हणत तू मूर्ख आहेस

कोण म्हणत तू माझी आहेस...


कल्पनेच्या जगात शिरलो

तिच्या प्रेमात पडलो

वास्तवातील तिला विसरलो

चारोळ्या लिहित गेलो...


दोनशे चारोळ्या लिहिल्या

माझ्या कल्पनेतील प्रेमावर

वास्तवात ती नाही

करायला प्रेम माझ्यावर...नैतिकता आणि अनैतिकता यामध्ये

अस्पष्ट रेषा असते

त्या रेषेचे नाव

दुर्दैवाने हल्ली प्रेम असते....उगाच समजू नका

मी प्रेमवेडा आहे

प्रेम कशाशी खातात

मला ठाऊक आहे ...प्रत्येक वर्षी संकल्प करतो

फक्त तिच्याच प्रेमात पडण्याचा

वर्ष संपता संकल्प असतो

ती सोडून प्रेमात पडण्याचा...तुझ्या प्रेमात पडल्यापासून

माझा शीघ्रकवी झाला

फेसबुकवर माझ्या कवितांचा

पाऊस सुरु झाला...आजही तुझी आठवण येता

मला स्वतः वर हसू येते

पण स्वतःवर हसत असताना

मला तुझी आठवण येते...प्रेमभंग झालेल्या कित्येकांचा

बऱ्याचदा देवदास होतो

पण दारूला नाकारणाऱ्याचा

फक्त कवी होतो...मी तिच्यावर प्रेम केले

तिने माझ्या कवितेवर केले

माझ्या कविता कामी आल्या

पण प्रेम वाया गेले...कविता फक्त तुझ्यावर लिहिली

बाकीच्यांची तर कथा झाली

लेखांची तर तऱ्हाच निराळी

माझ्या प्रेमाची निबंधे झाली...मी तुझी कविता

तू चारोळी आहेस

मी शब्दांचा सागर

तू नदी आहेस...मला अडचण नाही

तुला अडचण कसली

बस आपल्या दोघांची

एकच गरज भागली...तू हो म्हणाली असतीस

तर मोठा झालो असतो

मना विरुद्ध का होईना

जगाच्या शर्यतीत धावलो असतो...
दुसऱ्याचे भविष्य काही लोक

का घडवू पाहतात...

वर्तमानातही जर कित्येक गोष्टी

क्षणा क्षणाला बदलतात...कोणाचे तरी

व्हायचे

त्यापेक्षा नाही

जगायचे...मी प्रेम करतो तुझ्यावर

तू करू नकोस...

जगाच्या बंधनातून कधीच बाहेर

तू पडू नकोस...मी यशाच्या धुंदीत असताना

माझ्या प्रेमात पडू नको

माझ्या यशात धुंद झालेली

बेधुंद तू मला नको...कळत नाही तुला

तू ढोंग करतेस...

जगापासून चोरून

माझ्यावर प्रेम करतेस...लोकांना इमारत दिसते

पाया दिसत नाही

लोकांना प्रेम दिसते

मन दिसत नाही...मूर्खांनी माझ्या भानगडीत

कधीच पडू नये

शहाणे झाल्यावर होणारी

अडचण भोगू नये...स्वप्ने पहावीत तर

अपूर्ण राहणारी

आळशी जगतात स्वप्ने

पूर्ण होणारी...एकदा भेटू आपण पुन्हा

तू काहीच बोलणार नाहीस

तुझ्या डोळ्यात प्रश्न असतील

पण काहीच विचारणार नाहीस...हल्ली कित्येकांना

प्राण्यासारखेच जगायचे असते

सुखे भोगत

रोजच मरायचे असते...तुझ्या विरोधात

माझा सूर असतो

पण मी

तुझ्या विरोधात नसतो...माझे एक अक्षर

तुला कळणार नाही

मी कळणे तुला

जन्मात जमणार नाही...मी कळणे

इतके सोप्पे नाही

न कळताच

वर गेले काही...का मरावे

प्रेम करूनी तुझवरी

माझ्या जगण्यावरही

मरतात किती तरी...चिखलात उगवलेले कमळ

दुर्दैवाने मी आहे

माझे आकर्षण जगाला

चिखल नको आहे...खूप विचार केला तुझा

आता पुरे झाले

तुझा विचार करता करता

जग माझे झाले...

मी तुझ्या प्रेमात पडावं

अस तुझात काहीच नाही

तरी तुझ्या प्रेमात पडलो

आणि जगाचा राहिलो नाही...दगडातून एक सुंदर

शिल्प घडवायचे होते

काय माहित दगडात

शिल्प असावे लागते...तू काय मला

विकत घेणार आहेस

किंमत माझ्या प्रेमाची

काय लावणार आहेस...वाटले होते मला

तू माझ्या प्रेमात पडलीस

पण तू तर

माझ्या प्रेमाची किंमत लावलीस...प्रेम नको माझे तुला

जगातील सारी सुखे हवी...

सुख सारे भोगल्यावर म्हणशील

मला तुझी जागा हवी ...तुला अर्धे उगडे पाहिले

माझे संस्कार नागडे झाले

माझे डोळे मी मिटले

तू मला नालायक म्हटले....नको झाले मला जगणे

आशेने तुला पाहात राहणे

तुझ्यावर एकतर्फी प्रेम करणे

आणि तुला ते नकळणे....आता तुला कळेल

मी किती मोठा आहे

सारे जग आज

का माझ्यावर फिदा आहे....माझा सभोवताल सारा आता

फक्त स्वार्थाने भरला आहे

मी स्वार्थी होऊन आता

तिच्या प्रेमात पडणार आहे.....माझ्या चारोळ्यांचा अर्थ

तू लावत बसू नकोस

प्रेम असेल तर

सांगायला उशीर करू नकोस.....तुझ्या प्रेमात पडल्यावर

माझ्यातील राजा जागा झाला

त्यासोबत माझ्यात दडलेला

लबाड पुरुष जागा झाला....ती माझ्या कवितेला

जन्म देऊन गेली

ही माझ्या चारोळीचा

जीव घेऊन गेली...लोकं माझ्या फालतू

चारोळीच्या प्रेमात पडली

जेव्हा माझी चारोळी

तिच्या प्रेमात पडली....तुझ्यासाठी माझे प्रेम

एक मृगजळ आहे

तुझ्यामुळे आता माझेच

मुगजळ झाले आहे....खरे प्रेम काय असते

आता मला कळले

जेव्हा माझ्या हातात करण्यासारखे

काहीच नाही उरले...तुला का दोष देऊ

मी तुझ्या प्रेमात पडलो

मी माझे शहर सोडून

तुझ्या गावात चोरून शिरलो...केले असते प्रेम मजनुसारखे

दिवस रात्र तुझ्यावर

पण माझे दिवस - रात्र

कुर्बान झालेत जगावर...नैतिकतेच्या चौकटीत नबसणारे

माझे तुझ्यावरील प्रेम आहे

अनैतिकतेच्या चौकटी तोडणारे

करायला माझ्याकडे बरेच आहे...व्यक्त झालो असतो तुझ्याजवळ

पण मला भीती वाटते

तू नाही म्हणालीस तर

बदनामी असेल माझ्या जवळ...माझे पाय जमिनीवर असतात

काही ते ही ओढू पहातात

मग काय एक दिवस ते

माझ्या प्रेमाने लाथा खातात....मूर्खांना आज जग

शहाण म्हणत...

म्हणूनच आजच्या जगात

मूर्खांच फावत...कसला बाप

कसली आई

जग झाले

सारे मतलबी....मी बोलत नाही

म्हणजे मला बोलता येत नाही

मी बोललो तर

ते जगाला रुचणार नाही....जगाकडे प्रश्न असतात

माझ्याकडे फक्त उत्तरे

जगाकडे समस्या असतात

माझ्याकडे त्यावरील उतारे.....मूर्ख पाहतात मला

त्यांच्या नजरेतून

शहाणे पाहतात मला

माझ्या नजरेतून....शांती हवी मला

अशांत मनासाठी

एकांत हवा मला

माझ्या आनंदासाठी....स्वार्थी जगात या

सारे आता स्वार्थाने भरले

ज्याला माझे म्हणावे

असे कोणीच नाही उरले....प्रत्येकाने आपलाच स्वार्थ जपला

प्रत्येक आपलाच स्वार्थ जगला

माझ्यातला माणूस जागा राहिला

म्हणून माझाच बळी गेला.....तू अशिक्षित नसतीस

तर किती बर झालं असतं

माझ्या जगण्याला आज

एक वलय प्राप्त झालं असतं....काही हिशोब चुकते करायचेत

ते झाले एकदाचे

कि जगातील सारे बंध

एकदाच तोडून टाकायचे.....नाही जगायचे मला बंधनात

ना हिच्या ना तिच्या

ना जगाच्या ना समाजाच्या

ना बापाच्या ना आईच्या....आता मी कोणाचेच

काही ऐकणार नाही

जो घडवेल मला

त्याला सोडणार नाही...जगाला का वाटते

मला काहीच कळत नाही

मला सारे कळते

म्हणूनच मी बोलत नाही.....मी हि प्रेमात पडलो

पण कधीच स्वार्थी झालो नाही

माझे प्रेम सोडले मी

पण कर्तव्यात कमी पडलो नाही...सारड्यांच्यात रहातो मी

रंग बदलणाऱ्या

स्वार्थाचेही रंग स्वार्थासाठी

सहज बदलणाऱ्या....मला माणसे वाचता येतात

त्यांच्या डोळ्यात पाहून

ती बोलता मी पाहतो

त्यांच्या मनात डोकावून....माझ्या वेळेची किंमत

अजून ठरली नाही

ती ठरता कोणा

देणे जमणार नाही...माझी सारी संपत्ती

माझ्या सोबत आहे

मी जिथे आहे

तिथेच लक्ष्मी आहे...सभोवतालच्या मूर्खांना मी म्हणालो

आता माझा पाठलाग सोडा

मी कधीच काळापलीकडे गेलोय

आता तरी बंध तोडा ...


अज्ञानी माणसात राहून

माझे ज्ञान अज्ञान झाले

अज्ञान वाढत गेले

आता ज्ञानाचा सागर झाले.....बोलत नव्हतो मी

आता फक्त मी बोलणार

बोलणारे जग आता

फक्त मी बोलताना ऐकणार.....मी तो दिवा आहे

ज्याच्याखाली अंधार असतो

जगाला प्रकाश देतो साऱ्या

स्वतः अंधारात असतो....एका क्षणात तुझ्या

प्रेमात पडलो होतो

दुसऱ्या क्षणात मी

तिच्यात रमलो होतो....स्त्रियांना काय हवे असते

सापडले उत्तर या प्रश्नाचे

अधिकार हवे असतात स्त्रियांना

त्यांचे निर्णय त्यांनीच घेण्याचे...मलाच आश्चर्य वाटते

कसा तुझ्या प्रेमात पडलो

जग माझ्यावर भुळते

मी कसा तुझ्यावर भुळलो…समजू नकोस मला

तुला पर्याय नाही

माझ्या साऱ्या पर्यायात

तू कोठेच नाही...एकशे आठ चारोळ्यांची

माझी माळ तयार झाली

माझ्या परम मित्रासाठी

नववर्षाची भेठ तयार झाली...मूर्खांच्या बाजारात स्वतःला विकणे

मला नाही जमत...

त्यापेक्षा आवडते मला पडायला

बुद्धिजीवी लोकांच्या चरणात…भल्या पहाटे तुला

आठवून जाग आली

स्वप्नातील माझी कविता

आता वास्तवात आली…फक्त म्हण एकदाच

माझे तुझ्यावर प्रेम आहे

समज माझे आयुष्य

तुझ्या प्रेमाला अर्पण आहे...ती म्हणाली मला

तुझे प्रेम हवे

मी म्हणालो तिला

ते वाहून गेले...तिच्या आठवणीत मी

आयुष्य काढले असते

आठवणीतल्या तिने तसेच

रहायला हवे होते...आठवावा एक क्षण

तो फक्त दुसऱ्यासाठी जगलेला

कारण आपण गेल्यावर

तो क्षणच असतो उरलेला ...एक वर्ष सरले तरी

आठवतोय एक क्षण आनंदाचा

संकल्प होता माझा यावर्षी

तो क्षण साजरा करण्याचा...प्रेम कोणीच करत नाही

सारे त्याचे भांडवल करतात

काही तर त्यांच्या अनैतिकतेलाही

प्रेमाच्या नावावर नैतिक करतात...आधुनिकता कोणाच्याच पोशाखात नसते

ती प्रत्येकाच्या विचारात असते

विचार खरोखरच आधुनिक असतील

तर नग्नतेतही सौंदर्य दिसते...दारू पिऊन काय मिळते

हे पिणाऱ्याला माहीत नसते

न पिणाऱ्याला तर ते

न सुटलेले कोडे असते...आम्हाला जन्म दिला म्हणून

आम्ही आमच्या बापाला दोष देतो

आपल्या देशात आता कोणीही

जनतेला पोर काढण्याचा सल्ला देतो...ती गांव तर

मी शहर आहे

दोघांच्या मधे भिंत

फक्त विचारांची आहे…


सुवर्णावर त्या

काय प्रेम कराचे

प्रेम करायचेच

तर परिस शोधायचे...माझ्याशी बोलणारे

माझ्या प्रेमात पडतात

अबोल असणारे

माझ्यावर प्रेम करतात...


प्रेमात पडत नाही मी

कधी विनाकारण स्वतःच्याही

तुझ्या प्रेमात कसा पडेन

तू अनोळखी असतानाही...तिसरीत पहिलीच्या प्रेमात पडलो

सहावीत दुसरीच्या प्रेमात डुंबलो

बारावीत तिसरीच्या प्रेमात बुडालो

आता सवतीच्या प्रेमात अडकलो...कधी करणार मी

माझ्या मनासारखे

कधी उडणार मी

मुक्त पक्षासारखे…माझ्या प्रेमाच्या

आता चारोळ्या झाल्या

माझ्या आयुष्याच्या

आता कथा झाल्या...मित्र म्हणाला आता

चारोळ्यांचे शतक कर

काहीतरी तुझ्या आयुष्यात

एकदाचे पुरे कर …आंधळे झालेत सारे

डोळे असूनही

सभोवतालचा अंधार त्यांना

दिसत नाही...आंधळे झालेत सारे

डोळे असूनही

सभोवतालचा अंधार त्यांना

दिसत नाही...


जातीची गरज मला

कधीच भासली नव्हती

समतेचा घोष करत

मेंदूत भरली होती...संकल्प करण्यात

माझे आयुष्य गेले

गेलेल्या वर्षात

आयुष्य संकल्प झाले...मी म्हणतो मला

तुझ्यात रस नाही

तुला पाहिल्या खेरीज

जोश येत नाही ...मोठयांच्या चुकिला चूक

न म्हणण्याची संस्कृती वाढतेय

असेच होत राहिले

तर कसली चूक कळतेय...तुझ्यासोबत घालविलेला एक क्षणही

पुरेसा आहे मला जगण्यासाठी...

मग कशाला वेचू मी

माझे सारे आयुष्य तुझ्यासाठी…माझे प्रेम तुझ्यावरचे

हे अक्षरासारखे आहे

तुझ्या देहाचे काय

ते नश्वर आहे...मतलबी दुनियेतला मतलबी प्रियकर

मला कधीच व्हायचे नव्हते...

तुझ्या आधुनिकतेच्या प्रेमात पडून

प्रेमाचे बाजारीकरण करायचे नव्हते...प्रेमात पडावं अशा

लाखो असतात

पण साऱ्याच हृदयात

रहात नसतात...जिच्या प्रेमात पडावं

अशी ती एकच होती

तिनेच मला घडवलं

जी माझी प्रेरणा होती...तुला अक्का

मी नाहीच सापडलो

सापडलो तितकाच

जितका पुरून उरलो...माझ्या यशामागे ती होती

अपयशामागे कोण आहे

कित्येक वर्षे मी वेड्यागत

चोहीकडे शोधतो आहे...आमचे आवडते विषय

भूगोल आणि इतिहास

तिला भूगोल आहे

आणि मला इतिहास…एका डोळ्यात निर्भयता

दुसऱ्या डोळ्यात नम्रता

दोन्ही डोळे मिळता

आयुष्याची होते गीता...जग लहान दिसेल इतके

मोठे मला व्हायचे नाही

जग मान नकारेल इतके

लहान मला रहायचे नाही...मी गुलाब आहे

तुला प्रेमात पाडणारे

तुला दिसलेच नाहीत

माझे काटे टोचणारे...जेंव्हा कधी माझ्या

वेळेची किंमत वाढते

जवळ असणाऱ्या माझ्या

माणसांची किंमत घटते...फक्त एक सही

बाकी असेल करायची

प्रतीक्षा असेल मला

फक्त तुझ्या वहीची...एकच सेल्फी

माझ्या स्वप्नात आहे

ज्या सेल्फीत

ती सोबत आहे...माझ्या कवितेपेक्षा

चारोळी मोठी झाली

हृदयात शिरून

सरळ डोक्यात गेली...माझ्या कवितेपेक्षा

चारोळी मोठी झाली

हृदयात शिरून

सरळ डोक्यात गेली..झालो असतो उद्योगपती

कवींना नाही तोटा

असत्या खिशात माझ्या

त्या गुलाबी नोटा...भिंतीवर चित्र म्हणून

लटकण्यात कसली मजा

त्यापेक्षा पुस्तकाच्या कैदेत

बरी भोगलेली सजा...तिला पाहता माझी नजर

तिच्यावर किंचित स्थिरावते

पाहून झाल्यावर तिचे सौंदर्य

सुंदर !!! मन म्हणते...आकर्षणातुन निर्माण होणारे

प्रेम प्रेम नसते

नदीकडून समुद्राला मिळणारे

खरे प्रेम असते...पूर्वी स्त्री -पुरुष

यांच्यात फक्त प्रेम होते

आता प्रेम सोडून

गाडी दागिने घर असते...पूर्वी स्त्री -पुरुष

यांच्यात फक्त प्रेम होते

आता प्रेम सोडून

गाडी दागिने घर असते...कपड्याने झाकलेली आधुनिकता

भोकातून बाहेर येते

संस्काराने दबलेली वासना

नजरेतून बाहेर येते...माझ्या विचारांचा

तू विचार करू नकोस

भांडी घास

भांड्यात जीव गुंतवू नकोस...मी बोलून

काहीच केलेले नसते

मी केलेले

जग बोलत असते...करोडो जन्मतात

चौघात रमण्यासाठी

एखादाच जन्मतो

विश्वात रमण्यासाठी...माझा मित्र प्रेयसीला

नेहमी गावठी म्हणतो

त्याचे कारण विचारता

बंदी आहे म्हणतो...माझी प्रेयसी

चारोळी असते

चार ओळीत

मावणारी असते...माझी प्रेयसी

चारोळी असते

चार ओळीत

मावणारी असते...माझ्या चारोळीचा प्रवास आता

प्रेमातुन अध्यात्माकडे सुरु झाला

माझे मित्र म्हणतील आता

प्रेमवेड्याचा आध्यात्मिक गुरू झाला...मी तो नाही

जो मी दिसतो

मी जो दिसतो

तो मी नाही..माझ्या चारोळीतल्यागर्दी शब्दातही

माझ्या मित्राला मुंबई दिसली...

खरंच माझ्या छोट्याश्या मुंबईत

आता इतकी गर्दी झाली...स्वार्थाचे अनेक रंग दिसले

बदललेले आणि न बदललेले

प्रेमाचेही अनेक रंग पाहिले

पाहिलेले आणि न पाहिलेले…तुला मी वर दिसतो

तसा मी अजिबात नाही

माझ्या मनाचा थांग अजून

माझा मलाच लागला नाही...जग बदलण्याची ताकद राखणारे

स्वतः कधीच बदलत नसतात

जग नाही बदलले तरी

ते जगणे सोडत नसतात...मला माहीत आहे

मी तुला आवडतो

पण आवडत नाही

जसा मी जगतो...निरर्थक गोष्टींच्या मागे

हल्ली जग धावत...

धावून धावून थकलं

कि सन्यास घेतं...निरर्थक गोष्टींच्या मागे

हल्ली जग धावत...

धावून धावून थकलं

कि सन्यास घेतं...सामान्य माणसे जगतात

असामान्य माणसे झिझतात

सामान्यांचे वाढदिवस होतात

असमान्यांच्या जयंत्या होतात…एक वर्ष संपणार आता

एका संकल्पाचा बळी घेऊन

दुसरे वर्ष उजडणार मग

दुसऱ्या संकल्पा जन्मा घालून ...मूर्खांच्या बाजारात

अक्कल विकली जाते

अक्कल विकणाऱ्याला

गाढव म्हटले जाते...अकल्पित जोड्या जुळतात

या नश्वर जगात

लोक उगाच बोट

घालतात आपल्या तोंडात...तू माझ्या प्रेमात पडलीस

यात नवल काही नाही

मी तुझ्या प्रेमात पडलो

हे कोणासाठी खरे नाही...माझ्या प्रेमात पडलेले

प्रेमात पडलेले असतात

प्रेमाच्या नादात प्रेमालाचा

शिव्या घालत असतात...मी तिच्यात गुंतलो

ती जगात गुंतली

मी भविष्य झालो

ती भूतकाळात रमली…तुला डोळ्यासमोर ठेऊन

मी चारोळ्या लिहिल्या

प्रेमच्या काही बाजू

मी नव्याने पाहिल्या...अंतर कितीही असले

तरी कापता येते

एकदा प्रेमाचे पडले

की सारेच जमते...तू असलीस जरी

माझ्या स्वप्नातील परी

मला आवडते तरी

माझी प्रेयसी खरी...

तुझ्या मनात जे आहे

ते माझ्या गावात नाही

माझ्या मनात जे आहे

ते कोणाला माहित नाही…समजू नकोस माझ्या कविता

ह्या फक्त तुझ्यासाठी असतात

तुझ्यासारख्या कित्येक जणी रोज

माझ्या कविता होत असतात...वाटलं नव्हतं स्वप्नात

तू अशी असशील

माझ्या अगोदर प्रवाहात

तू आधुनिकतेच्या पोहशील...मोबाईलचा सिम काढून

मेंदूत बसवावा लागेल

नात्यांचे जगातील साऱ्या

थडगे बांधावे लागेल…बेंबीच्या देटातुन ओरडणारे

प्रेम प्रेम प्रेम

का करतात प्रेमाचाच

गेम गेम गेम ...भल्या पहाटे तुला

आठवून जाग आली

स्वप्नातील माझी कविता

आता वास्तवात आली...भल्या पहाटे ती

माझ्या स्वप्नात आली

सुप्रभात म्हणून मला

जागे करून गेली...तू जमिन

मी रविकिरण

भेटण्यास आलो

घेऊन सुप्रभात...तुला आठविता माझा

दिवस शुभ जातो

तुला आठविण्यात माझा

वर्षही निघून जातो...बोललो नाही कधी

माझे तुझ्यावर प्रेम आहे

माझ्यातील लबाड पुरुष

प्रत्येक दिनी जागा आहे

काळ चार चारोळ्या

लिहताना घाम फुटत होता

आज तुला आठविता

चारोळ्यांचा पाऊस पडत होता...बस्स झाले आता

तुझ्या प्रेमात पडणे

मला हवे आहे

माझे वास्तवातील जगणे...माझ्यातला कवी झोपला

कि लेखक जागा होतो

कवी स्वप्नात रंगतो

लेखक वास्तवात जगतो

आता माझे

तुझ्यावर प्रेम नाही

तू कोण

मी जाणत नाही...माझ्यातला कवी

फारच प्रेमळ आहे

पण लेखक

हिऱ्या सारखा आहे...यावर्षीचे माझे उरलेले प्रेम

पुढच्या वर्षात जमा होईल

त्यात तुझे प्रेम मिसळता

नवीन वर्ष शुभ होईल...आकाशाला भिडणारे प्रेम

आता कानाला भिडले

हृदयात शिरणारे प्रेम

मोबाईल मध्ये घुसले...मला मोठे व्हायचे होते

पण फक्त तिच्या नजरेत

मोठा झालो मी जगासाठी

पण नालायक तिच्या नजरेत..माझ्या चारोळ्या वाचा

सहन करू नका

नाही आवडल्या तरी

छान म्हणू नका...वाटत नाही कोणाला

मी प्रेमवेडा आहे...

कारण प्रेमाने मला

बोलताच येत नाही...माझी कविता रोज

तरुण होत गेली

माझे तारुण्य रोज

थोडे चोरत गेली....माझी कविता काळापलीकडे

कधीच जात नाही

तरी कोणतीच बंधने

काळाची जुमानत नाही...माणसांच्या गर्दीत मला

कधीच हरवायचे नव्हते

गर्दीतला एक माणूस

कधीच व्हायचे नव्हते...भूत भविष्य आणि वर्तमान

आपल्या जागी स्थिर असते

मी बदलत गेलो वेड्यासारखा

ती मात्र तशीच असते...का घाबरते का थरथरते

तुझे प्रेम माझ्या समोर

माझे प्रेमच वादळ होते

असता माझ्या तू समोर...करोडो चांदण्या जरी नभात

असते एकच त्याच्या जवळी

माझ्या सभोवताली त्या असतात

मी असतो तुझ्या जवळी...फाटक्या कपड्यातून डोकावणारे

सौंदर्य पहावे लागते

फाटक्या हृदयातून सांडणारे

प्रेम जमवावे लागते...माझी प्रेमाची व्याख्या

फारच निराळी आहे

राधा- कृष्णाच्या अगदी

जवळ जाणारी आहे...आभाळ दाटून येते

आकाश निरभ्र असते

वासना दाटून येते

प्रेम निरभ्र असते...मला घायाळ करण्यासाठी

शेवटी अस्त्र वापरले...

माझ्यापर्यंत पोहचण्यासाठी तू

तुझे सौंदर्य खुलवले...कविता कवी लिहतो

कविता कवी वाचतो

कविता कवी ऐकतो

कविता कवी जगतो..त्या कित्येकींच्या आनंदासाठी

ती दुःखी राहिली

त्या चारोळ्याच राहिल्या

तिची कविता झाली...तुझ्यासाठी वाया घालविलेले

दिवस आता कामी आले

त्या दिवसांतील प्रत्येक तासाचे

आता कवितेतील शब्द झाले...नैतिकतेच्या सीमा ओलांडून कधीच

शिरलो असतो तुझ्या मिठीत

पण संस्कार आणि विचार

ठासून भरलेत माझ्या कुडीत.....माझ्यावर प्रेम करणारे

हजार खरे आहेत

तुझ्यावर प्रेम करणारे

सारे लबाड आहेत...माझी वेदना आता

माझीच झाली आहे

माझ्या वेदनेची आता

कविता झाली आहे...आदर्शांचे स्मारक असावे

पण प्रत्येकाच्या हृदयात

नाहीतर त्याच्या विचारांचे

स्मारक होते चौकात...आदर्शांना आदर्श मानत

लहानाचा मोठा झालो

मोठा झाल्यावर मी

आदर्शांचा आदर्श झालो ...नैतिकता आणि अनैतिकता यामध्ये

अस्पष्ट रेषा असते

त्या रेषेचे नाव

दुर्दैवाने हल्ली प्रेम असते....


उगाच समजू नका

मी प्रेमवेडा आहे

प्रेम कशाशी खातात

मला ठाऊक आहे ...प्रत्येक वर्षी संकल्प करतो

फक्त तिच्याच प्रेमात पडण्याचा

वर्ष संपता संकल्प असतो

ती सोडून प्रेमात पडण्याचा...तुझ्या प्रेमात पडल्यापासून

माझा शीघ्रकवी झाला

फेसबुकवर माझ्या कवितांचा

पाऊस सुरु झाला...आजही तुझी आठवण येता

मला स्वतः वर हसू येते

पण स्वतःवर हसत असताना

मला तुझी आठवण येते...प्रेमभंग झालेल्या कित्येकांचा

बऱ्याचदा देवदास होतो

पण दारूला नाकारणाऱ्याचा

फक्त कवी होतो...मी तिच्यावर प्रेम केले

तिने माझ्या कवितेवर केले

माझ्या कविता कामी आल्या

पण प्रेम वाया गेले...कविता फक्त तुझ्यावर लिहिली

बाकीच्यांची तर कथा झाली

लेखांची तर तऱ्हाच निराळी

माझ्या प्रेमाची निबंधे झाली...


Rate this content
Log in

More marathi poem from Nilesh Bamne

Similar marathi poem from Romance