STORYMIRROR

Nilesh Bamne

Others

4  

Nilesh Bamne

Others

पाऊस

पाऊस

1 min
361

पाऊस यंदाचा पाऊस जरा वेगळा आहे 

हवेत गारवा पण पाऊस मंद आहे 

अधून मधून थोडा थोडा कोसळत आहे 

कोरडी छत्री दिवसातून एकदा भिजवत आहे 

हा पाऊस पाहिला तर तसा प्रणयरम्य आहे 

पाऊसात भिजल्यावर सुकायला वेळ देत आहे 

अजून तरी शहाण्यासारखा वागत आहे 

शेतकऱ्यांना शेतात त्यांच्या रमू देत आहे

अजूनही पाणीकपातीला पाऊस हवा आहे ... 

म्हणजे धो - धो पावसाचा मार्ग मोकळा आहे... 

पाऊस आणि हिरवळ यांचे नाते मधूर आहे 

अजून तरी पाऊस हवा हवासा वाटत आहे... 


Rate this content
Log in