STORYMIRROR

vaishali vartak

Action

2  

vaishali vartak

Action

संकल्प यशाचा

संकल्प यशाचा

1 min
54

  दृढ विश्वास

काम घेताची हातात

करावा *संकल्प यशाचा*

नसे काहीच अशक्य 

 मंत्र मनी ठसवायचा 


 घेता काम समजून 

 यत्न होतात सुलभ

योग्य मार्गदर्शनाने

नुरते अपयशाचे मळभ


 अडचणी येणारच नेहमी

विश्वासाने टाकावे पाऊल

 मनी हवीच चिकाटी

 दिसते यशाची चाहूल


जिद्द पहा स्वातंत्र्य वीरांची 

संकल्प केला मनी यशासाठी

मिळवला विजय इतिहासात

स्वातंत्र्य मिळविण्यासाठी 


नको राग ईर्षा मनी

राखा दृढविश्वासाचे बळ

संयम राखूनी करी काम

संकल्प यशाचा देई फळ


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Action